Skip to main content

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वृद्धपकाळाने झाला मृत्यू .

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वृद्धपकाळाने झाला मृत्यू . 

     शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज दि 15/11/2021 रोजी पहाटे ठीक 5 वाजून 7 मिनिटांनी मृत्यू झाला आहे .ते बऱ्याच दिवसापासून प्रकृती बिघडल्याने  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते .



    त्यांची प्रकृती खूपच खराब असल्याने त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले होते .तर आज ठीक 5 वाजून 7 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला .असे दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने प्रेस नोट काढून जाहीर केले आहे .

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झाले आहेत .त्याने ' राजा शिवछत्रपती ' हे प्रसिद्ध ग्रंथाचे लिखाण केले आहे .त्याचबरोबर प्रसिद्ध 'जाणता राजा' या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे .

   अशा या महान व्यक्तिमत्त्व असणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत 10:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Comments