तुरुंगात राहून विदेशी नागरिकांना लुटले .
सध्या चोरी करणारे चोर सुध्दा ऑनलाइन माध्यमातून चोरी करू लागले आहेत .अशाच प्रकारची चोरी समोर आली आहे .अनंत अग्रवाल नावाचा हा मूळ बीड ,महाराष्ट्र येथील रहिवाशी असून त्याने ऑनलाइन हॅकिंग माध्यमातून करोडो रुपयांची चोरी केल्याची समोर आली आहे .
हा हॅकर्स मागील काही वर्षांपासून अशाच गुन्हामुळे मध्य प्रदेश येथे तुरुंगात आहे .तरीसुद्धा त्याने ऑनलाइन हॅकिंग करून चोरी केलीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे .कारण तुरुंगात कोणत्याही प्रकारची साधनांचा वापर करणे गुन्हा आहे .तरीसुद्धा ऑनलाइन हॅकिंग करून केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील नागरिकांचे सुद्धा पैसे त्याने उकळले आहे .
यामध्ये तुरुंगातील पोलीस प्रशासनाचा देखिल हात असल्याचे सांगितले जात आहे .कारण त्याच्याकडे लॅपटॉप काही क्रेडिट कार्ड चे नमुने त्याच्याकडे सापडले आहे .
त्यामुळे पोलीस प्रशासन मध्ये मोठी खळबळ दिसून येत आहे .केंद्रीय सायबर गुन्हा शाखेने हा गुन्हा तपास केला आहे .
Comments
Post a Comment