आता बस महामंडळ मध्ये होणार भरती प्रक्रिया .
सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे .हा संप मागील 25 दिवसापेक्षा चालूच आहे त्यामुळे यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने आता राज्य सरकारने टोकाची भूमिका घेणार असल्याची बातमी परिवहन मंत्री यांनी दिली आहे .
यामध्ये प्रामुख्याने 2017 व 2019 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेमधील वेटिंग वर असणारे उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे .
याबाबत मागील परीक्षेतील वेटिंग वर असणाऱ्या उमेदवारांची माहिती गोळा करण्याचे काम चालू आहेत .
बस महामंडळ मध्ये कार्यरत असणारे रोजंदारी पध्दतीने काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तासाच्या आत कामावर हजर होण्याचे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे .अन्यथा सेवा समाप्ती केले जाईल अशी नोटीस देण्यात आली आहे .
जर बस महामंडळ कर्मचाऱ्यांनि आपला संप मागे नाही घेतल्यास त्यांची सेवा समाप्ती केले जाईल असे राज्य शासकडून कठोर भूमिका घेतली आहे .
Comments
Post a Comment