Skip to main content

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी धक्कादायक बातमी.

 राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी धक्कादायक बातमी.

मुंबई - महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आलेली आहे .ती म्हणजे मागील सहा महिन्याच्या काळामध्ये ज्या निवृत्तीवेतन धारकांनी किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी आपल्या पेन्शन खात्यामधून पेन्शन रक्कम उचल केली नाही अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम आता शासनास परत जाणार आहे.

याबाबत नागपुर कोषागार विभागाने तसा पत्र बँक मॅनेजर ला पाठवला आहे. कारण कोरोणा महामारीच्या काळामध्ये बऱ्याच निवृत्ती वेतन धारकांना चा मृत्यू झाला आहे .त्यामुळे त्यांची रक्कम परस्पर बँक खात्यातून उचल केली जात आहे. असे आढळून आल्यामुळे शासनाने मागील सहा महिन्याच्या काळामध्ये  पेन्शन खात्यामध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम शासनास परत होणार आहे.

शासनास कोषागार नियमानुसार ही रक्कम बँक खात्यातून परत घेतली जाऊ शकते, असा महाराष्ट्र कोषागार अधिनियमामध्ये तरतूद आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्याच्या काळामध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम बँक खात्यामधून उचल करून घ्यावी , अन्यथा ती रक्कम शासनास परत जाणार आहे .

  याबाबतचा पत्र खालील प्रमाणे आहे.




Comments