बस महामंडळ कर्मचाऱ्यांची मागणी बाबत शासन सकारात्मक .
सध्या 20 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत .तरीसुद्धा बस महामंडळ कर्मचाऱ्यांनि आपला संप मागे घेतला नाही आहे .संपाच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 28 % व घरभाडे भत्ता वाढ करण्याबाबतची मागणी होती .ह्या दोन्ही मागण्या मान्य झालेले आहेत .
परंतु या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की, बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मुख्य मागणीसाठी मागील 20 दिवसापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांना संपावर कायम आहेत .
यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे .त्याचबरोबर सध्या शाळा सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे .यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय काढून त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे .यावर राज्य शासन सकारात्मक असून बस महामंडळ कर्मचाऱ्यांना लवकरच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळणार आहे .
या संपामध्ये जवळपास 700 बस महामंडळ कर्मचाऱ्यांवर संप कायम ठेवल्याने निलंबित करण्यात आले आहेत .यावर राज्य शासन लवकरच उच्च न्यायालय मध्ये पाठपुरावा करणार असून बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळणार आहे .
Comments
Post a Comment