Skip to main content
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्न .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्न .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक आर्थिक प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहेत .यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता अजून पर्यंत मिळाला नाही.
त्याचबरोबर महागाई भत्ता थकबाकीचा प्रश्न आणखीन प्रलंबीतच आहे .यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही .केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्वरित भत्ते व वेतन वाढी लागू केल्या जातात .परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यासाठी खूप दिवस वाट पहावी लागते .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आश्वासीत प्रगती योजना 10/20/30 वर्षे लाभ अजून पर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही .
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक आर्थिक प्रश्न जसे की,अनेक कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तरी सुद्धा त्यांना आश्वासित योजनांचा लाभ मिळालेला नाही .तसेच पेन्शन विक्री आदेश येऊन सुद्धा त्या बाबीतचा आर्थिक प्रश्न मिटला जात नाही.
अशा सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारकडून डिसेंबर अखेर निर्णय होण्याची शक्यता आहे .वरील सर्व प्रलंबित आर्थिक बाबी लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही हे प्रश्न अजून पर्यंत प्रलंबितच आहेत.
Comments
Post a Comment