पेन्शनधारकासाठी हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ.
पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून यामध्ये राज्य पेन्शन धारक कर्मचार्यासाठी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दिनांक 9 डिसेंबर 2021 निर्गमित करण्यात आले आहे शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.
खालील लिंक वर क्लिक करून शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.
Comments
Post a Comment