Skip to main content

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय.

 राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय.

     राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 3 टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागाकडून सकारात्मक बातमी आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 31 टक्के केला जाईल परंतु वाढीव 3 टक्के महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणे 01 जुलै 2021 पासून लागू करण्यास राज्य शासनाचा तूर्तास विचार नाही.



  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक महागाई भत्ता वाढ लागू केल्यास, राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे .

   वाढीव 3 टक्के महागाई भत्ता केंद्राप्रमाणे 01जुलै 2021 पासूनच लागू करावा. अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे .महागाई भत्ता 31 करण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून अंतिम स्वरूप दिले असले , तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम असणार आहे. 

   कारण हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणे 01 जुलै 2021 पासुनच लागू करावा अशी राज्य सरकारची कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे .

Comments