Skip to main content

आता फक्त याच खाजगी वाहनांना करता येणार प्रवास

 आता फक्त याच खाजगी वाहनांना करता येणार प्रवास.

     महाराष्ट्र मध्ये सध्या दि .30 एप्रिल 2021 पर्यंत लॉकडाउन आहे ,परंतु सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल याची भीती वाढू लागली असल्याने मुंबई  शहरांमध्ये आता पोलिस प्रशासन मार्फत नवीन नवीन लागू करण्यात आले आहे .यामध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचारी प्रवास करू शकतील .विनाकारण फिरण्याऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल .खाजगी वाहनांवर आता कलर कोड पद्धत चालू करण्यात आली आहे .यामध्ये जे कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी आहेत त्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे .व त्यांच्या खाजगी वाहनावर कलर कोड लावण्यात येईल .

 कलर कोड हे तीन प्रकारचे असून यामध्ये लाल,हिरवा,पिवळा असे तीन कलर कोड ठेवण्यात आले आहेत .

लाल - आरोग्य कर्मचारी च्या खाजगी वाहनांसाठी लाल कलर कोड .

पिवळा - अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच्या खाजगी वाहनांवर पिवळा कलर कोड .

हिरवा - भाजीपाला, फळे विक्रेते यांच्या खाजगी वाहनांवर हिरवा कलर कोड.

खाजगी वाहनांवर लाल ,हिरवा,पिवळा कलर कोड असणाऱ्या खाजगी वाहनांनाच प्रवास करता येणार आहे .

 हे पण वाचा 

Comments