डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजनाची सुरुवात .
योजनेचे नाव - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजना".
मंत्रालय विभाग - ऊर्जा ,उद्योग व कामगार विभाग .
योजनेचे उद्दिष्ट -
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब परिस्थिती मधून आपले शिक्षण पूर्ण केले व मिळवलेल्या ज्ञानाचा वापर त्यांनी मागासवर्गीय ,वंचित, गरीब जनतेला प्रकाशाच्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे .त्यामुळे त्यांच्या या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ज्यांच्या घरी वैयक्तिक विजजोडणी केलेली नाही अशा पात्र कुटुंबाना वैयक्तिक वीज जोडणी करण्यासाठी विशेष योजना .
पात्रता -
- लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
- लाभार्थी हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असावा .
- या अगोदर लाभार्थीच्या नावे कोणतेही थकीत वीज बिल असू नये .
- या अगोदर लाभार्थीच्या नावे वीज जोडणी असू नये.
योजनेचा कालावधी - ही योजना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून म्हणजे 14 एप्रिल 2021 पासून ते दि .06 डिसेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणार आहे .
आवश्यक कागतपत्रे -
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचा दाखला .
अनामत रक्कम - लाभार्थीने अनामत रक्कम रुपये 500 /- महावितरण कार्यालयात जमा करावे लागणार आहे .
ही योजना गरीब गरजू नागरिकांचे जीवनमान प्रकाशमय करण्यासाठी राबविण्यात येत असून,ही योजना सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी कृती दलाची स्थापनाही करण्यात आली आहे .
हे पण वाचा
Comments
Post a Comment