Skip to main content

कोतवाल भरती ,वेतन व पदोन्नती संपूर्ण माहिती.

 कोतवाल भरती ,वेतन व पदोन्नती संपूर्ण माहिती.

   कोतवाल हे पद महसूल खात्यातील सर्वात खालचे पद असून ,काही काळ हे पद जिल्हा परिषद विभागाकडे वर्ग करण्यात आले होते .व परत हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले .हे पद अगोदर आनुवंशिक रित्या भरण्यात येत होते 1963 पासून हे आनुवंशिक पद भरती रद्द करून हे पद महसूल खात्यामार्फत भरण्यात येते .सन 1963 पर्यंत हे पद गावसेवक / कनिष्ठ ग्रामसेवक या नावाने ओळखले जात होते .

पात्रता -
  • 4 थी पास असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा किमान 18 व कमाल 40 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • MSCIT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मानधन -
    मासिक मानधन रुपये 5000 /- प्रतिमहा दिले जाते .तसेच शासकीय कर्मचारी प्रमाणे सुट्टी ,सेवानिवृत्त फायदे या पदास लागू आहेत .

कामकाज -
  • रात्रीच्या वेळेस पोलीस पाटीलास गस्त घालण्यासाठी मदत करणे .
  • ग्रामसेवकास विवाह नोंदणी ,जन्म नोंदणी करण्यात मदत करणे .
  • गावात दवंडी देणे .
  • तलाठी ला कार्यालयीन वेळात मदत करणे .
  • शेतसारा भरणे ,शुल्क जमा करणे ग्रामपंचायत पातळीवर असणाऱ्या शासकीय संपत्तीवर देखरेख ठेवणे .
  • सरपंच, ग्रामसेवकास ,व तलाठीस प्रशासन कामकाजात मदत करणे . 
  • एखाद्याचे मृत्यू झाल्यास त्याला शवविच्छेदन साठी मदत करणे .
  • शासकीय दप्तर चांगले ठेवणे .
भरती प्रक्रिया -
   जिल्हाधिकारी मार्फत स्पर्धा परीक्षाचे आयोजन करून भरती प्रक्रिया राबविण्यात येते .यामध्ये 100 गुणाची परीक्षा घेऊन निवड करण्यात येते.

पदोन्नती - कोतवाल हे पद शासकीय पद असून मानधन स्वरूपात कार्यरत असते .त्यामुळेच उपलब्ध महसूल खात्यामधील शिपाई पदावर कोतवालास पदोन्नती दिली जाते .
 हे पण वाचा.

Comments