"ब्रेक द चेन " या मिशन अंतर्गत काय चालू व काय बंद असेल पाहा सविस्तर. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत " ब्रेक द चेन " या मिशनद्वारे काही गोष्टीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये काही गोष्टीवर सूट देण्यात आले आहेत. काय चालू व काय बंद असेल त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत. काय सुरू असेल ? 1)नियमित वाहतूक सुविधा चालू राहील. सर्व प्रकारची नियमित वाहतूक सुरू राहतील रिक्षात केवळ दोन प्रवासी प्रवास करू शकतील .टॅक्सीत निश्चित केलेल्या प्रवासी संख्या पेक्षा 50% प्रवासी प्रवास करू शकतील .तर बस मध्ये उभा राहून प्रवास करता येणार नाही प्रवास करताना आपला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोरोना लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच रेल्वे मध्ये जनरल डब्ब्यात उभा राहून प्रवास करता येणार नाही. 2)शासकीय कार्यालय 50%कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालू असेल शासकीय कामकाज हे चालू राहील कामकाज दरम्यान शासकीय कर्मचारीची 50% उपस्थिती राहील .कार्यालय प्रमुखांनी बैठका ह्या ऑनलाइन घ्यावेत. 3)शेतीविषयक कामकाज सुरू राहील सर्व शेतीविषयक कामकाज खते ,बि...