Skip to main content

Posts

आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .

 आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .    आज दि 30 मे 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले .यामधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत . लॉकडाउन हे 15 मे पर्यंत वाढवले असून त्यात काही कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही . पुढील दोन महिने शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली आहे . गरीब लाभार्थीना पुढील दोन महिने मोफत राशन देण्यात येणार आहे . पुढील काळात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे . श्रावणबाळ योजना ,तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थीना दोन महिन्याची रक्कम याच महिन्यात मिळणार आहे . लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची मर्यादा लावण्यात आली आहे . रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता नसल्यास वापर करू नये .

लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .

 लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .    सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या जरी घटली असली तरी ,कोरोनामुळे रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .त्यामुळेच महाराष्ट्र राज्याने लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे .यावर सर्व मंत्रिमंडळ बैठकीत सार्वमताने यावर निर्णय घेण्यात आला आहे .   1 मे पासून वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्यात येणार आहेत .लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ वर नोंदणी करावी लागणार आहे .   निर्बंध हे कायम असणार असून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्याचा विचार अद्याप केलेला नसून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत .   ग्रामीण भागात वयोवृद्ध नागरिक लसीकरण करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहेत .

महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.

 महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.    महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली असून कोरोना काळातही सुशिक्षित बेरोजगारांना भरती प्रक्रिया काढून काहीसा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे .शिवाय टपाल खात्यातील डाक सेवक हे कोरोना काळामध्ये आपली भूमिका मोठ्या काळजीपूर्वक निभावत आहे .ह्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याने केंद्र सरकारने 2448 पदसंख्येसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक यामध्ये 3 पद येतात - 1) शाखा पोस्टमास्टर 2 ) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर 3) डाक सेवक . पद संख्या - 2428 पात्रता -  1)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2) MSCIT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा - 18 ते 40 . वेतन - 10000 /- ते 14500 /- कामाच्या तासानुसार वेतनमान ठरवलेले आहेत . भरती प्रक्रिया -   भरती प्रक्रिया ही नेहमी प्रमाणे 10 वि च्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल...

मोबाईल चा विमा (Insurance) कसा काढायचा.

 मोबाईल चा विमा (Insurance) कसा काढायचा.        आजकाल प्रत्येक गोष्टीचा विमा काढता येतो .आयुष्याचा जीवन विमा ,तसेच जनावरांसाठीचा विमा शिवाय काही अभिनेत्रीनी आपल्या सुंदरतेची विमा काढला आहे .आपण मोबाईलचा विमा कसा काढायचा ते पाहणार आहोत .  मोबाइल विमा कसा काढायचे फायदे - मोबाईल  खराब झाल्यानंतर दुरुस्ती साठी येणारा PLAN नुसार खर्च मिळेल . मोबाईलची स्क्रीन ,हँग झाल्यास येणारा खर्च मिळेल . मोबाइल दुरुस्ती खर्च मिळेल . 71% मोबाईल दुरुस्ती खर्च मिळेल . विमा प्रीमियम PLAN -   विमा प्रीमियम 599 /- पासून सुरू होते . विमा कसा काढायचा -    आपल्या संबंधित नोंदणीकृत मोबाइल कार्यालयात विमा काढता येईल .शिवाय ऑनलाइन पद्धतीने PAYTM APPS वरी ,ऑनलाइन मोबाईल विमा काढता येतो .

LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .

 LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .    आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये विम्याला किती जास्त प्रमाणात महत्त्व दिले जाते .भारतीय  जीवन विमा ही एक सरकारी विमा कंपनी असल्याने या कंपनीवर लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात आहे .भारतीय लोकांची मानसिक ही आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवाराचे कसे यासाठी भारतीय लोक जास्त प्रमाणात विमा काढून घेतात .विमा हे विमा प्रतिनिधी मार्फत काढला जातो हे आपल्याला माहीतच आहे .परंतु आपल्याला त्यांना मिळणारे कमिशन किती असते हे आपल्याला माहिती नसते .विमा प्रतिनिधीचे कमिशन खूप जास्त असते .   याचा फायदा घेऊन विमा प्रतिनिधी म्हणूनच स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय आपण सुरु करू शकतो .शिवाय यामध्ये कोणतेही मोठे भांडवल नसून केवळ लोकांना पटवुन लोकांचे विमा काढून देणे .तसेच विमा प्रिमियम भरणे असा स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय करू शकता . पात्रता -  10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी पटवून सांगण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. विमा प्रतिनिधी ID कशी मिळवावी .   LIC विमा प्रतिनिधी होण्यासाठी तुम्हाला जवळच्या LIC कार्यालयास भेट द्यावी लागेल  .मॅन...

आज रात्रीपासून जिल्हाबंदी वआंतरराज्य बंदी ,प्रवासासाठी लागेल पास.

 आज रात्रीपासून जिल्हाबंदी वआंतरराज्य बंदी ,प्रवासासाठी लागेल पास.    सध्या कोरोनामुळे मृत्यू प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून ,शिवाय रुग्णांना बेडच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोरोना रुग्ण दगावण्याची संख्या वाढत आहे .त्यामुळे हा कोरोनाचा पादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत .तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत ,त्यामुळेच राज्यात आज रात्री 8 पासून राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली आहे .तसेच आंतरराज्य बंदी करण्यात आली आहे .यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आता पासची आवश्यक लागणार आहे तेही अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करता येणार आहे .यामध्ये केवळ अत्यावश्यक कामकाज जसे रुग्णांना व त्यासोबत एका नातेवाईकास तसेच सरकारी कर्मचारी यांनाच प्रवास करता येईल पास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळेल किंवा ऑनलाइन पोलीस संकेतस्थळावरून अर्ज करून मिळवता येईल .   खाजगी बसेस मध्ये प्रवास करताना केवळ 50% प्रवाशांना प्रवास करता येईल तेही अत्यावश्यक कामकाज असल्यास प्रवास करता येईल.

नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन गळती मुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू .

 नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन गळती मुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू .    नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन पुरवठा गळती मुळे तब्बल 22 कोरोना रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला आहे .याबाबत सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त करत आहे .या घटणेसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याने सर्व स्तरावरून यावर टिका होत आहेत .   ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू मुखी पडले .यासाठी सर्व बाजूंनी स्थानिक प्रशासनास जबाबदार धरले असून केंद्र स्तरावरून याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. परत असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनास सक्त ताकीत देण्यात आले आहे .शिवाय महाराष्ट्र राज्यामध्ये ऑक्सिजन बेडची अपुरी पडणारी संख्या लक्षात घेता केंद्राने याकडे लक्ष देऊन महाराष्ट्र राज्यास ऑक्सिजन पुरवठा वाढवावा अशी आशा व्यक्त केली आहे .   रुग्णाला ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग करावी लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईक कडून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .