आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे . आज दि 30 मे 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले .यामधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत . लॉकडाउन हे 15 मे पर्यंत वाढवले असून त्यात काही कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही . पुढील दोन महिने शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली आहे . गरीब लाभार्थीना पुढील दोन महिने मोफत राशन देण्यात येणार आहे . पुढील काळात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे . श्रावणबाळ योजना ,तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थीना दोन महिन्याची रक्कम याच महिन्यात मिळणार आहे . लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची मर्यादा लावण्यात आली आहे . रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता नसल्यास वापर करू नये .